सिनेमा, मालिकांमध्ये काम करत कलाकार आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मन जिंकत असतात. त्यांना स्क्रिनवर चांगल दाखवण्यामागे अनेक क्रू मेंबरचा हात असतो. सेटवर काम करण्याबरोबर कलाकार आणि क्रू मेंबर धमाल आणि मजामस्ती देखील करताना दिसून येतात. फावल्या वेळेत सेटवर हे सर्वजण आपल्या आवडीनिवडी जपण्याचा आणि नवनवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत असतात. अशाच एका मालिकेच्या सेटवर एक वेगळी गोष्ट करण्यात आलेली आहे. ती म्हणजे एका मालिकेच्या सेटवरील क्रू मेंबर्सनी चक्क शेती केलीये. होय, स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित होणारी ‘आई कुठे काय करते’ या मालिकेच्या सेटवर क्रू मेंबर्सनी शेती केली आहे. नुकतेच अभिनेत्री रूपाली भोसले हिने सोशल मिडीयावर एक व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमधून रूपालीने ‘आई कुठे काय करते’च्या सेटवर वांग या फळभाजीची लागवड केली असल्याचे दिसून येते.
Shraddhavo
#RupaliBhosale #Aaikuthekarte #Sanjana #Arundhati #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber